tolee
India & National Affairs
Tolee NewsIndia & National Affairs

Arjun Ranatunga : श्रीलंकेच्या क्रिकेटरचा नवा लुक चर्चेत; बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? चला जाणून घेऊया

अर्जुन रणतुंगानी तब्बल ७२ किलो वजन कसे कमी केले ? श्रीलंकेचे माजी क्रिकेट कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या वजनातील मोठ्या बदलामुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हे कसे शक्य झाले?, कोणते उपाय केले? असे प्रश्न सगळेच विचारत आहेत. या वेटलॉस साठी त्यांनी कोणती शस्त्रक्रिया केली का? याबद्दल सविस्तर जाणून घ्या. Bariatric Surgery : बॅरिएट्रिक सर्जरी बॅरिएट्रिक सर्जरी ही लठ्ठपणा आणि चयापचयाशी (Metabolic) संबंधित आजारांवर मात करण्यासाठी अत्यंत शास्त्रीय व वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेला उपचार आहे. बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? आणि ती कोणासाठी आवश्यक आहे? बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये पोटाचा (Stomach) आकार लहान केला जातो आणि अन्नाचा पचनसंस्थेतील प्रवास बदलला जातो (उदा. स्लीव्ह गॅस्ट्रोक्टॉमी किंवा गॅस्ट्रिक बायपास). यामुळे अन्नाचे प्रमाण तर कमी होतेच, पण भूक आणि साखरेचे नियंत्रण करणाऱ्या संप्रेरकांमध्येही (Hormones) सकारात्मक बदल होतो. BMI : ज्या व्यक्तींचा BMI 40 किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना ही सर्जरी सुचवली जाते. इतर आजार असल्यास : जर BMI 35 किंवा त्याहून अधिक असेल आणि सोबत मधुमेह, उच्च रक्तदाब (High BP), स्लीप ॲप्निया (निद्रानाश/घोरणे), फॅटी लिव्हर किंवा सांधेदुखी यांसारखे आजार असतील, तर ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. शस्त्रक्रियेतील धोके : सुरक्षितता :- लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया पोटविकारांच्या इतर सामान्य शस्त्रक्रियांसारखीच सुरक्षित झाली आहे. शस्त्रक्रियेपेक्षा उपचार न केलेला लठ्ठपणा हा जास्त धोकादायक असतो, ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि कर्करोगाचा धोका वाढतो. वाजनातील बदल : वजन कमी होणे - प्रत्येक व्यक्तीचे वजन कमी होण्याचे प्रमाण वेगळे असते. ते सुरुवातीचे वजन, वय, शारीरिक हालचाल आणि आहाराच्या सवयींवर अवलंबून असते. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांच्या ट्रान्सफॉर्मेशनशी (Transformation) करू नये. शस्त्रक्रियेनंतरचा आहार आणि जीवनशैलीतील बदल शस्त्रक्रियेनंतर आहाराची सुरुवात द्रवपदार्थांपासून (Liquids) होऊन हळूहळू मऊ अन्न आणि नंतर संतुलित अन्नाकडे केली जाते. आहाराचे नियम - आहार छोट्या भागात विभागून घ्यावा. (Small Portions) घेणे, अन्न नीट चावून खाणे, प्रथिनांना (Protein) प्राधान्य देणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. काय टाळावे - गोड पेये आणि जास्त प्रक्रिया केलेले अन्न पूर्णपणे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनसत्त्वे आणि खनिजांचे सप्लिमेंट्स दीर्घकाळ घ्यावे लागतात. केवळ वजन कमी होणे नव्हे, तर 'आरोग्यात सुधारणा' हाच मुख्य उद्देश : आजारांतून मुक्ती/नियंत्रण - या सर्जरीमुळे टाईप 2 मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो किंवा नियंत्रणात येतो. उच्च रक्तदाब, स्लीप ॲप्निया, फॅटी लिव्हर आणि सांधेदुखीमध्ये मोठी सुधारणा होते. महिलांचे आरोग्य : लठ्ठपणामुळे महिलांमध्ये होणारे संप्रेरकांचे असंतुलन (Hormonal disorders) सुधारून प्रजननक्षमता (Fertility) वाढण्यास मदत होते. वजनाच्या काट्यावरील आकड्यांपेक्षा या आजारांमधून मिळणारा दिलासा जीवनमान सुधारतो. शस्त्रक्रियेचे यश : या शस्त्रक्रियेचे यश डॉक्टर, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि रुग्ण यांच्या समन्वयावर अवलंबून असते. शस्त्रक्रियेनंतरचा पहिला वर्षभराचा काळ नवीन निरोगी सवयी लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अंतिम ध्येय : केवळ बारीक दिसणे हे याचे ध्येय नाही. लठ्ठपणाशी संबंधित आजारांचा त्रास कमी करणे, हालचाल सुलभ करणे, मानसिक आरोग्य सुधारणे आणि निरोगी आयुष्य जगणे हेच बॅरिएट्रिक सर्जरीचे खरे यश आहे. सेलिब्रिटींचे मेकओव्हर हे प्रेरणेसाठी ठीक आहेत, परंतु लठ्ठपणा हा एक गंभीर आणि वैद्यकीय आजार आहे हे समजून घेतले पाहिजे. बॅरिएट्रिक सर्जरी हा कोणताही शॉर्टकट नसून, योग्य जीवनशैली आणि वैद्यकीय मार्गदर्शनासह आरोग्याला दीर्घायुष्य देणारा एक सिद्ध उपचार मार्ग आहे!

S
Suman Kumar@suman_kumar
8/8/2026 | 6:56 pm 2 Min Read
Media 1
AI Generated Executive Summary

Latest updates on Arjun Ranatunga : श्रीलंकेच्या क्रिकेटरचा नवा लुक चर्चेत; बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? चला जाणून घेऊया. Read verified analysis on Tolee News.

📌 **महत्त्वाच्या घडामोडी**: • Arjun Ranatunga : श्रीलंकेच्या क्रिकेटरचा नवा लुक चर्चेत; बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? चला जाणून घेऊया संदर्भात लेटेस्ट अपडेट समोर आले आहेत. • जाणून घ्या आजच्या ताज्या बातम्या व विशेष रिपोर्ट. 📖 **सविस्तर वृत्त**: आज Arjun Ranatunga : श्रीलंकेच्या क्रिकेटरचा नवा लुक चर्चेत; बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय? चला जाणून घेऊया विषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी यावर भाष्य केले आहे. ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी टॉली न्यूज पाहत रहा.

t/
Published In Community ToleeAI Automation Society
14
U